Sunday, February 18, 2024

HSC PHYSICS - TIPS 25

HSC PHYSICS - TIPS 25

## IMPORTANT PRACTICE QUESTIONS FOR HSC BOARD EXAM 2024— Click the Links

1) For Chapter 1 to 5 

https://ravindrawaykolesciphy.blogspot.com/2024/02/12th-physics-imp-practice-questions.html

2) For Chapter 6 to 10

https://ravindrawaykolesciphy.blogspot.com/2024/02/important-practice-questions-12-th.html

3) For Chapter 11 to 16

 https://ravindrawaykolesciphy.blogspot.com/2024/02/12th-physics-imp-questions-for.html

****************************

HSC (12 वी) Physics प्रश्नपत्रिका सोडविताना घ्यावयाची काळजी

HSC विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर सुचना 

 HSC Board चा Physics paper  सोडविताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी विशेष लक्षात घेवून Paper सोडवावा.

# Board Physics paper च्या 15  दिवसांपूर्वी काय करावे-

15 Days before HSC EXAM

1] प्रत्येक Chapter मधील खालील सर्व मुद्दे (Points) Revise करावीत. 

खालील सर्व मुद्दे समजावून घेऊन लक्षात ठेवा आणि पाठ करा.

Definitions,  State the Laws, Rules, Theorems, Principals , Statements, formulae, Equations, Units, Dimensions, Significance of – ve sign, Sign conventions, Properties/ Characteristics, Examples, Illustrations,Uses, Applications, Types, Processes, Advantages, Disadvantages, Merits, Demerits, Assumptions, Postulates, Limitations, Analogy, Truth Tables, Short note, Distinguish/ Differences between, Infer, Similarities, 

2] आकृत्यांविषयी (Diagrams) महत्त्वाचे:

Diagram pencil ने geometric box चा वापर करून काढाव्यात.

 Textbook मधील सर्व diagrams चा सराव करून तयार करा/लक्षात ठेवा. Diagrams वेगवेगळ्या प्रकारच्या विचारल्या जाऊ शकतात. जसेकी,

General /Science diagram, Vector diagram, FBD ( free body diagram), Vertical section/ Top view/ Side view diagrams, Schematic diagram, Constructional diagram, Mechanical Set-up diagram, Experimental Set-up diagram, Ray diagram, Energy flow diagram, Geometrical diagram, Internal structure of instrument, Schematic structure, Circuit diagram, Block diagram, Symbols, Circuit symbol, Graphs, p- V diagram, Wave form, Phasor diagram इत्यादि सर्व बाबी.

3] Derivations सोडविताना —

 Related diagram pencil ने geometric box चा वापर करून काढावी. Diagram वरून Description/ Explanation लिहावे. Derivation करण्यासाठी आवश्यक त्या Physics, Maths formula, Geometry, Trigonometry चा steps मध्ये योग्य वापर करावा. नंतर final formula, equation, relation derive करून box मध्ये लिहावे.  

4] एक आणि दोन मार्क्सच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करावा. 

#हे लक्षात ठेवा:

 प्रश्नपत्रिका 4 Section मध्ये विभागीत केलेली आहे. (Sections– A, B, C & D). प्रश्नपत्रिका सुरुवातीला General Instructions दिलेल्या असतात. त्यांना काळजीपूर्वक वाचाव्यात.

 5] Section A मध्ये Q. 1 अंतर्गत 10 MCQ ( 7 Theory + 3 Numerical problems आणि Q. 2 मध्ये 8  V.S.A.( 6 Theory + 2 Numerical problems असतात. असे एकूण 18 मार्क्सचे प्रश्न असतात.

6] Section B मध्ये Q. 2 ते Q. 14 अंतर्गत 2 Marks चे एकूण 12 प्रश्न 7 Theory + 5 Numerical problems असतात त्यापैकी 16 मार्क्सचे 8 प्रश्न compulsory सोडवायचे असतात.

7] Section C मध्ये Q. 15 ते Q.26  अंतर्गत 3 Marks चे एकूण 12 प्रश्न 7 Theory + 5 Numerical problems असतात. त्यापैकी 24 मार्क्सचे 8 प्रश्न compulsory सोडवायचे असतात.

8] Section D मध्ये Q. 27 ते Q 31 अंतर्गत 4 Marks चे 2 प्रश्न pure Theory questions आणि  3 प्रश्न (2 मार्क्स theory + 2 मार्क्स Numerical  problems) म्हणजे 4 मार्क्सचेच असतात. त्यापैकी 12 मार्क्सचे कोणतेही 3 प्रश्न compulsory सोडवायचे असतात.

9] वरील प्रश्नांची गुणविभागणी पाहता 1 व 2 गुणांच्या प्रश्नांची तयारी केली असता एकूण 46 मार्क्स मिळू शकतात.  

## Numerical Problems  विषयी काही:

Numerical Problems सोडविण्याचे तंत्र आणि मंत्र

Textbook मधील सर्व Physics concept/Terms आणि Formulae  चा अभ्यास करून ती लक्षात ठेवावीत.

Numerical problems (Solved and Unsolved from Exercise)चाच जास्त सराव करा. अधिकची Practice होण्यासाठी इतरही अधिकृत पुस्तकातील problem सोडवण्याचा सराव करावा. 

Numerical Problems सोडवितांना कसे लिहावे: Numerical Problems Presentation in Answer sheet

 दिलेले Numerical Problem  काळजीपूर्वक नीट वाचावा. त्यात दिलेल्या physical quantities च्या values note कराव्या. त्यांना गरजेनुसार एकाच system of unit मध्ये आणाव्यात. त्यातील अटी वाचून mathematical expression मध्ये रुपांतरीत convert करून घ्याव्यात. Problem सोडवण्यासाठी कोणता Physics concept लागेल याचा नीट विचार करावा.

संबंधित Physics formula लिहावा. त्यात values substitute कराव्यात. नंतर सहजपणे simplify करता येत असेल तरच करावे. गरजेनुसार Log calculations करावे. शेवटी Answer लिहून योग्य unit द्यावे. उत्तरला Box करावा.

## प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव:

मागील 5 वर्षाच्या HSC Board च्या (Feb/ July exam) प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. अधिक सरावासाठी 5 सॅम्पल पेपर्स किंवा मॉडेल पेपर्स घड्याळ लावून वेळेत सोडवावेत आणि आपल्या विषय शिक्षकांकडून त्या तपासून घ्याव्यात. (पेपर कसा लिहावा हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला दोन किंवा तीन पेपर   Textbook चा वापर करून सोडवावा.)

### Physics board exam च्या दिवशी हे करा:

Paper सोडविताना खालील गोष्टी लक्षात घ्या:

आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या (Diagrams) काढाव्यात.

10] प्रश्नपत्रिका सोडवताना Section wise क्रमानेच प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.

11] MCQ चे उत्तर लिहिताना option चा योग्य alphabet  (a) किंवा (b), किंवा (c) किंवा (d) असा लिहून त्यापुढे शब्दात उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. 

उदा. Q.1 (i) (c) conservation of charge (ii) (a) 2 volt असे लिहावे. 

MCQ मध्ये अजिबात खाडाखोड करू नये. (प्रश्न अजिबात लिहू नये ) तसेच MCQ चे answer Repeat लिहू नये. नंतर पुन्हा लिहिलेल्या MCQ ला गुण मिळतच नाही.(Only first attempt is considered for assessment).

 10) एका मार्कच्या प्रश्नाचे (VSA) नेमके उत्तर एका ओळीतच अपेक्षित आहे. काही वेळा एका शब्दात / अंकात (or number with unit) पण असू शकते.

11) Mcq आणि VSA प्रकारच्या प्रश्नांमध्ये ½ मार्क देण्याची तशी provision किंवा marking scheme नाही. 

12) Numerical problems सोडविताना π ची किंमत 3.142 अशी घेतली तरच मार्क्स मिळतील. 

13) प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर सर्व सूचना वाचून घ्याव्यात. त्यातील शेवटच्या सूचनेतील Section A च्या अगोदर दिलेले Physical constants काळजीपूर्वक वाचावे.

14) Numerical problems साठी योग्य Formula लिहून, substitution केले तरी त्यासाठी प्रत्येकी ½ गुण मिळतात. ( काही वेळा 3 Marks च्या Numerical मध्ये प्रत्येकी 1 गुण मिळु शकतो. उत्तर योग्य unit सह नाही लिहिल्यास अथवा चुकीचे लिहिल्यास ½ मार्क कमी केला जातो.

15) प्रश्नपत्रिकेत अधिक प्रश्न असल्याने  कोणते प्रश्न सोडवायचे त्याचे selection विचारपूर्वक करा. जसे की ज्या विद्यार्थ्यांची Theory, चांगली असेल त्यांनी त्यास प्राधान्य द्यावे. आणि ज्या विद्यार्थ्यांस numericals मध्ये चांगली गती असेल त्यांनी त्यास प्राधान्य द्यावे. ज्या विद्यार्थ्यांचा संपुर्ण अभ्यास झाला असेल त्यांनी प्रश्नपत्रिकेतील Derivations आणि Numericals यास जास्त प्राधान्य द्यावे. असे केल्याने पेपर मध्ये चांगला score मिळतो. आणि Paper वेळेच्या आधी लिहुन होतो.

16) त्या त्या section मधील प्रश्न त्या त्या section मध्येच लिहा. एका section मधील question दुसर्‍या section मध्ये लिहून mix करू नका.

17) Choice of questions in Sections B, C & D are very important as student has to attempt 8 questions out of 12  (12 पैकी ८ सोडवायचे आहेत) in section B and C. तसेच  section D  मध्ये 3 out of 5 (5 पैकी 3 सोडवायचे  आहेत). प्रत्येक section मध्ये (B,C, D) 1 ते 2 उपप्रश्न sub question अधिकचे Extra सोडवावीत.

18) Paper representation उत्तम करणेसाठी प्रत्येक प्रश्नाचे heading लिहा आणि अधोरेखित underline करा.

जसे की, Statement, figure, construction, working, uses, Definition, Law ,Rule etc. 

 19) उत्तरातील महत्त्वाच्या शब्दांना key words अधोरेखित करावे. 

Numerical problems मध्ये Answer लिहिताना उत्तरास अधोरेखित ( underline) करावे अथवा box करावा.

20] Section B मध्ये कमीत कमी 2 small derivations 2 Marks चे आणि C मध्ये 2 ते 3 big derivations 3 Marks चे विचारले जातील असे गृहीत धरा.   Derivations मध्ये diagram , Explanation,  final formula / Equation याचे प्रत्येकी ½ marks हमखास मिळतात. ( एखाद्या विद्यार्थ्याला संपूर्ण derivation येत नसेल तर त्याने अशा पद्धतीने लिहिले तरी 1½ marks मिळतात.)

21] Numerical problems मध्ये Formula लिहून substitution केले तरी त्याचे Marking Scheme प्रमाणे प्रत्येकी ½ गुण मिळतात.  Numerical problem संपूर्ण सोडवल्यास त्या मध्ये सर्वच्या सर्व गुण मिळवता येतात.

22] Distinguish between....... या प्रकारचा प्रश्न सोडविताना tabular form मध्ये लिहावा. दोन्ही रकान्यात (column मध्ये) same parameter (मुद्द्या) संदर्भात फरक लिहावा. दोन्हीकडे मुद्दे बरोबर असतील तरच संपूर्ण एक मार्क मिळेल. ½ मार्क देण्याची त्यात तशी provision (marking scheme) नाही. 

23] a) Diagrams 1 or 2 Marks साठी विचारले असतील तर Correct Diagram साठी १/२ किंवा १ मार्क आणि 4 Labelling  करिता राहिलेला १/२ किंवा १ मार्क.

b) Ray diagram मध्ये direction (arrow) correct दाखवणे आवश्यक आहे. तसेच Brewster's law ची diagram असेल तर angle between Reflected Ray and Refracted Ray 90° असलाच पाहिजे. 

c) काही diagram मध्ये rectangular components of vector असतात. Vector F चे components F cosθ and F sinθ यामधील angle exact 90° असला पाहिजे.

d) Circuit diagram मध्ये direction of the current arrow ने correct दाखवला पाहिजे. शिवाय cell (battery) असेल  battery symbol च्या terminals ला + ve व - ve  sign दाखवा.

अत्यंत महत्वाचे:

24] उत्तर पत्रिकेचे Main Page काळजीपूर्वक हाताळावे.

उत्तरपत्रिकेत प्रश्न लिहू नयेत. प्रश्नाच्या उत्तराला संबंधित Title द्यावे.

Section A मध्ये, MCQs ची उत्तर लिहिताना एका ओळीला १ च लिहावे. नंतर १ ओळ सोडून पुढील MCQ चे उत्तर लिहावे. तसेच VSA मध्ये प्रत्येक उपप्रश्न झाले की १ ओळ सोडावी. 

प्रत्येक Section ची सुरुवात नवीन पेजवर करावी. तसेच Section  B, C, व D मध्ये प्रत्येक उपप्रश्न झाला कि एक ओळ सोडून  पुढील उपप्रश्न सुरू करावा. 

प्रत्येक section मधील निवडलेले उपप्रश्न सलग लिहावेत. शक्यतो दोन section मधील उपप्रश्न एकमेकात Mix करू नयेत. अगदीच नाईलाज झाला तर सर्वात शेवटी असे राहिलेले उपप्रश्न Section, Question No, Sub question No आणि Title सह लिहावेत.

25] Numerical Problems सोडवताना Log Table आवश्यकता असेल तर तो वेळेच्या आधी (Advance मध्ये) मागून घ्यावा. त्याचप्रमाणे Main उत्तर पत्रिका लिहून संपायला येण्याच्या आधीच Supplement मागून घ्यावी.

### ALL THE BEST ###


1 comment:

  1. अत्यंत उपयुक्त माहीती

    ReplyDelete

Study of Logarithmic Table and other Tables

Visit: www.ravindrawaykolesciphy.blogspot.com   For 11th and 12th Students   USE OF LOGARITHMIC TABLES & OTHER MATHEMATICAL TABLES In Ph...